मुंबई : ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देण्याची मुभा देण्यात आली आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जातवैधता प्रमाणपत्राअभावी राखीव प्रवर्गांतील उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहणार नाहीत. या वर्षी राज्यात जवळपास १५ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, त्यातील हजारो उमदेवारांना या निर्णयाने दिलासा मिळाला. या निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आतापर्यंत बंधनकारक होते. जातपडताळणी समित्यांकडे असलेल्या सध्याचा कामाचा व्याप पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात जातवैधता प्रमाणपत्रे निकाली काढणे या समित्यांना शक्य होणार नाही. अशावेळी प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी उमेदवारांची तारांबळ उडाली असती ती आजच्या निर्णयाने थांबली आहे. (विशेष प्रतिनिधी)च्या वर्षी राज्यात जवळपास १५ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, त्यातील हजारो उमदेवारांना या निर्णयाने दिलासा मिळाला.
जात वैधतेसाठी सहा महिन्यांची मुदत
By admin | Updated: February 4, 2015 02:12 IST