Join us

पनवेल, नवी मुंबईतून सहा लाख जप्त

By admin | Updated: October 13, 2014 02:02 IST

तर पनवेलमध्ये दोन ठिकाणी रोख रकमेसह चौघांना अटक केली. खारघर पोलिसांनी यासंदर्भात भरणेकुमार चलगुल्ला (४७), समद पवकी यांना अटक केली.

नवी मुंबई : नाकाबंदीत खारघरमध्ये शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन जाणा-या (एम. एच. ०६ , एजे. ३६९३) स्कॉर्पिओ गाडीला सेक्टर २१ मधील हावरे स्प्लेंडर या ठिकाणाहून खारघर पोलिसांनी पकडले. तर पनवेलमध्ये दोन ठिकाणी रोख रकमेसह चौघांना अटक केली. खारघर पोलिसांनी यासंदर्भात भरणेकुमार चलगुल्ला (४७), समद पवकी यांना अटक केली. तर खांदा कॉलनीत सचिन पाटील (२७) व भूषण भोईर (२५) या दोघांकडून १५ हजार ५०० रुपये व वाशी येथे एमएच ४३ एके १०१० या इन्व्होवा कारमधून २ लाख ६० हजार जप्त करुन गाडीचा चालक श्रीनिवास कोनर याला ताब्यात घेण्यात आले. पनवेलमध्ये प्रकाश कांबळे (५०) व रोहित यादव (३०) यांच्याकडे १ हजार रुपयांची १०४ पाकिटे पकडली.