Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक

By admin | Updated: November 28, 2015 01:35 IST

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर रविवार २९ नोव्हेंबर रोजी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड दरम्यान घेतला जाईल.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर रविवार २९ नोव्हेंबर रोजी सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड दरम्यान घेतला जाईल. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते भार्इंदर दरम्यान पाच तासांचा आणि हार्बरवर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते पावणेपाच वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानके प्रवाशांना उपलब्ध होणार नाहीत. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते पनवेल, वाशी, बेलापूरपर्यंतची लोकल सेवा रद्द असेल. सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरही बोरीवली ते भार्इंदर दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)