अमरावती : राजकमल चौक नजीकच्या मुंशी कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी सकाळी १० वाजता शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत चार दुकानांची मोठी हानी झाली. अग्नीशमन दलाने वेळेत पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले. बडनेरा मार्गावरील राजेश गुणवंत देशमुख यांच्या मालकीचे मुंशी कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये मोहिन परवेज यांचे क्लिनिक व अमित चांडक, श्रीकांत हेडा, शहजाद खान यांच्या मालकीच्या प्रतिष्ठानांना आगीची झळ पोहोचली. दुकानातील साहित्य जळून खाक झाले. अग्नीशमन विभागाची चमू वेळीच दाखल झाल्यामुळे या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या अन्य प्रतिष्ठानांना आगीच्या विळख्यातून वाचविण्यात यश मिळाले. या आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आकडा मिळू शकला नाही.
भांडुपमध्ये सहा उमेदवारांमध्ये लढत
By admin | Updated: October 3, 2014 01:03 IST