Join us

‘त्या’ बलात्कार प्रकरणी सहा आरोपींना अटक

By admin | Updated: June 26, 2015 22:52 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला मुंब्रा पोलीस ठाण्यातील हवालदार कौशल काकडे हा स्वत:हून पोलिसांना शरण आला.

ठाणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला मुंब्रा पोलीस ठाण्यातील हवालदार कौशल काकडे हा स्वत:हून पोलिसांना शरण आला. तर या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून त्यात पिडीत मुलीच्या सावत्र पित्यासह मुंब्य्रातील एका क्लब मालकाचादेखील यात समावेश आहे. आरोपींना शुक्र वारी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयाच्या आवारात व पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातला. मुंब्रा अमृतनगर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोघा पोलिसांनीच तीन महिने लैंगिक अत्याचार केल्याचे एका संस्थेने उघड केले होते. दोघा आरोपी पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न होत असतांना सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती. यातील काकडे पोलिसांना शरण आला. तर इरफान खान याला शुक्र वारी सायंकाळी अटक झाली.