मुंबई : युती आणि आघाडी तुटल्याने चार मोठय़ा पक्षांबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बहुतांश मतदारसंघांत चौरंगी वा पंचरंगी लढती होणार आहेत. या बडय़ांच्या लढतींचा फटका छोटय़ा-छोटय़ा पक्षांना बसण्याची शक्यता आहे. आतार्पयत हे छोटे-छोटे पक्ष युती-आघाडीच्या वळचणीला होते. मात्र जागावाटपावरून चर्चा फिसकटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, भाजपा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. साधारणपणो 25 वर्षानंतर हे मोठे पक्ष स्वतंत्रपणो नशीब आजमावत आहेत.
जनता दल, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्ष अशा पक्षांनीही अनेक मतदारसंघांतून आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र या पक्षांपाठोपाठ मनसेचा क्रमांक लागत असल्याने या सर्व लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत या छोटय़ा पक्षांची स्थिती अवघड झाली आहे.
अल्पउत्पन्न वर्गातील लोक तसेच मजूर आणि लहान शेतक:यांची दखल मोठे पक्ष घेत नाहीत. त्यामुळे या वर्गाला बळ देण्यासाठी आम्ही कायम लढत आलो आहोत. त्यामुळे या बडय़ा पक्षांबरोबरही आम्ही लढू, असा निर्धार शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. रायगड आणि ठाणो जिल्ह्यात शेकापचे चांगले बस्तान होते. याशिवाय काँग्रेस व शिवसेनेचेही अस्तित्व आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही तेथे हातपाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेकापला जास्त जोर द्यावा लागेल.
जनता दल या वेळी खूप आशावादी आहे. चार मोठय़ा पक्षांमध्ये होणा:या लढतीचा फायदा छोटय़ा पक्षांना होऊन त्यांना जास्त जागा मिळू शकतात. त्यातच आम्हाला मिळणारी मते ही निश्चित असून आमचे पारंपरिक मतदार इतरांना मते देणार नाहीत. त्यामुळे आमच्या उमेदवारांना जास्त संधी आहे.
- प्रभाकर नारकर, अध्यक्ष, जनता दल, मुंबई