Join us
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या बहिणी सावंतवाडीतून बेपत्ता

By admin | Updated: September 22, 2015 23:55 IST

पोलीस स्थानकात तक्रार

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातून मंगळवारी दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ उडाली आहे. या दोघींची नावे आरती खुलसिंग चव्हाण (वय २०) तर दुसरी सुप्रिया संजय राठोड (वय ३२) असून ती विवाहित आहे. तक्रार या दोघींची आई अनिता चव्हाण हिने सावंतवाडी पोलिसात दिली आहे. या तक्रारीनंतर पोलीस दोघीही बहिणींचा शोध घेत असून उशिरापर्यंत दोघीही बहिणी सापडल्या नाहीत.आरती चव्हाण व सुप्रिया राठोड या सख्ख्या बहिणी होत्या. त्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या मागे झोपडीत राहत होत्या. सोमवारी सायंकाळी त्या मिलाग्रीस नजीक असलेल्या इमारत बांधकामच्या कामावरून आल्या. त्यानंतर त्या रात्री झोपडीतच होत्या. मात्र, मंगळवारी सकाळी अचानक गुढरित्या त्या झोपडीतून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली.आई अनिता चव्हाण हिने सर्वत्र शोधाशोध केली. पण त्या दोघी सापडून आल्या नाहीत. सुप्रिया ही विवाहानंतरही आपल्या माहेरीच राहत होती. हे कुटुंब मुळचे सोलापूर येथील असून गेली दहा वर्षे सावंतवाडीसह परिसरात इमारत बांधकामाच्या ठिकाणी काम करीत होत्या. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)