मुंबई : दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी रात्रीपासून बंद केलेला सायनचा उड्डाणपूल शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला.सायन उड्डाणपुलाच्या बेअरिंग बदलण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) सुरुवात करण्यात आली असून, आत्तापर्यंत आठपैकी दोन ब्लॉकही घेण्यात आले आहेत. एमएसआरडीसीमार्फत दुसऱ्या टप्प्यातील काम २७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले. हे काम २ मार्चला सकाळी सात वाजेपर्यंत चालणार होते.मात्र, हे काम वेळेआधीच पूर्ण करण्यात एमएसआरडीसीला यश आले आहे. या टप्यात ३२ बेअरिंग बदलण्यात आले असून, शनिवारी दुपारी दीड वाजल्यापासून सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.
सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 01:49 IST