मुंबई : सायन उड्डाणपुलाचे ६४ बेअरिंग दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या बसविण्यात आले असून, आता तिसऱ्या टप्प्यातील काम शुक्रवार, ६ मार्चला सकाळी ६ वाजल्यापासून ते ९ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत १६ बेअरिंग बदलण्यात येतील.आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार, उड्डाणपुलाच्या बळकटीकरणासाठी १६० बेअरिंग बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. या कामासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहील.
सायन उड्डाणपूल उद्यापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:45 IST