Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकच समाजमंदीर दोनदा बांधले ?

By admin | Updated: April 13, 2015 02:29 IST

जव्हार तालुक्यात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. बोगस कामे करण्याचे पेवच सुटले आहे. काम कागदोपत्रीच करायचे आणि प्रत्यक्षात केले तर निकृष्टदर्जाचे

प्रेमानंद पालवे, रायतळेजव्हार तालुक्यात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. बोगस कामे करण्याचे पेवच सुटले आहे. काम कागदोपत्रीच करायचे आणि प्रत्यक्षात केले तर निकृष्टदर्जाचे करून शासनाचा निधी कसा लाटता येईल हेच उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले जाते आहे.जव्हार शहराला लागूनच ग्रामपंचायत रायतळे यांची जांभूळ विहीर येथे हद्द आहे. जांभूळ विहीर येथे सर्व सुशिक्षित आणि श्रीमंत लोकांची वस्ती आहे. या सुशिक्षित लोकांनाच गंडा घालत रायतळे ग्रामपंचायतीने आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१४-१५ मध्ये जांभूळ विहीर येथील पूर्व मधुबन कॉलनी येथे ४ लाख ८० हजार स्थानिक आमदार निधीतून खर्च करून एक समाज मंदिर बांधले हे काम स्वत: ठेकेदार म्हणून ग्रामपंचायत रायतळे यांनीच बांधले.या कामाला प्रशासकीय मान्यता दि. ५/१०/१२ रोजी मान्यता दिली. तर तांत्रिक मान्यता जानेवारी १३ मध्ये देण्यात आली. ठेकेदार म्हणून ग्राम पंचायत रायतळे यांना दि. ६/५/१३ रोजी सहा महिने मुदतीत पूर्ण करण्यासाठी या कामाचा कार्यादेश देण्यात आला आणि हे काम पूर्ण करण्यात आले.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम सन २०१४-१५ या एक वर्षांत जव्हार तालुक्यासाठी एकूण २१ कामे आमदार निधीतून करण्यात आली. या कामाकरीता एकूण ६४ लाख ३३ हजार आमदार निधीतून खर्च करण्यात आला. त्यात ही एक काम दोन वेळेस दाखविण्यात आली आहेत. त्यातले एक पूर्ण तर दुसरे प्रगतीपथावर आहे, अशी नोंद करण्यात आली आहे. एक काम दोन वेळेस ठेकेदार ग्रा.पं. रायतळे आणि जि.प. बांधकामचे अधिकारी यांनी स्थानिक आमदार विष्णू सवरा यांनाच गंडा घातला आहे.