सिंगल पा (क्राईम)
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
नाशिकरोडला दोघा जुगार्यांना अटक
सिंगल पा (क्राईम)
नाशिकरोडला दोघा जुगार्यांना अटकनाशिक : करन्सी नोट प्रेसच्या गेटजवळील भिंतीलगत मटका खेळणारे संशयित प्रदीप कमलाकर खंदारे व श्याम हिरामण जाधव या दोघांना नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून अटक केली़ त्यांच्याकडून ४५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़दुचाकीच्या धडकेत मुलगा जखमीनाशिक : टाकळीरोडवरील रामदासस्वामीनगरजवळ दुचाकीने (क्र. एमएच १५, सीजे-४७४७) पायी जाणार्या रणवीर संजय जाधव या मुलास ठोस दिल्याने तो जखमी झाला़ या घटनेनंतर संशयित दुचाकीचालक संजय धोंडीराम जाधव फरार झाला़माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळनाशिक : शेती व वीटभी टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी मनीषा ऊर्फ माया मुसळे (मोरे मळा, पंचवटी) या विवाहितेने पती सुकदेव व सासरचे नातेवाईक शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे़किरकोळ कारणावरून एकावर वारनाशिक : विजय कॉलनीतील रहिवासी अमोल गिरीश पैठणकर हे वडिलांना शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांच्यावर संशयित रमेश रामचंद्र कानडे यांनी धारदार शस्त्राने वार केले़ त्यांच्यावर गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शालिमार परिसरातून दुचाकीची चोरी नाशिक : हनुमानवाडी येथील योगेश्वरी विहारमध्ये राहणारे चंद्रकांत नंदलाल बंडाळे यांची दुचाकी (एमएच १५, डीए-७८२०) शालिमारजवळील निर्माण ग्लास सेंटरजवळून चोरीस गेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़