Join us  

पूजा गायतोंडे यांच्याशी आज सूरज्योत्स्ना संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:52 PM

गेल्या वर्षी हे संगीत पुरस्कार सोहळे भारतातील आठ शहरांत पार पडले होते आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

मुंबई : भारतीय अभिजात संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा सूरज्योत्स्ना संवाद यंदाही १८ ते २४ मे पर्यंत यूट्यूब आणि फेसबुक लाइव्हवर रात्री ९.३० वा. रंगणार आहे. राष्ट्रीय स्तरावर संगीत प्रतिभा ओळखण्यासाठी दिवंगत श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मरणार्थ लोकमत माध्यम समूहाने हे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुरू केले आहेत.

या सुरेल संवादांतर्गत सोमवारी, १८ मे रोजी रात्री ९.३० वाजता होणाऱ्या संगीत मैफलीत सूरज्योत्स्नाच्या दुसऱ्या पर्वाच्या विजेत्या आणि लोकप्रिय भारतीय गजल गायिका पूजा गायतोंडे यांना भेटण्याची संधी रसिकांना मिळेल. रागदारीच्या पारंपरिक ज्ञानाचा भक्कम पाया असलेल्या गजल गायिका म्हणूनही पूजा यांची ओळख आहे. त्यांच्याशी गौरी यादवाडकर संवाद साधतील. गौरी या सूर ज्योत्स्नाच्या ज्यूरी मेंबर आहेत.

अभिजात भारतीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी २०१४ मध्ये ‘सूर ज्योत्स्ना’ या सांगीतिक विचाराला सुरूवात झाली. प्रभावशाली उदयोन्मुख प्रतिभावंतांची ओळख पटविणे, भारतीय शास्त्रीय आणि लोकप्रिय संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख तरुण कलाकारांचा सन्मान करणारे हक्काचे व्यासपीठ अशी ओळख ‘सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारा’ने अल्पावधीत मिळवली आणि गेल्या सात वर्षात या पुरस्काराने अवघ्या देशात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

गेल्या वर्षी हे संगीत पुरस्कार सोहळे भारतातील आठ शहरांत पार पडले होते आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. गेल्या वर्षी विशेष सूर जोत्स्नाचे जे अँथम लाँच करण्यात आले, त्याचे गीतलेखन जावेद अख्तर यांनी केले होते, तर प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी ते गायले होते. त्याला ललित पंडित यांनी स्वरसाज चढवला होता. ते यूट्यूबवर ऐकता येऊ शकते. याच सोहळ्याचा एक भाग म्हणून सोमवारपासून संगीत संवाद रंगणार आहे.या सुरेल संवादात सहभागी होण्यासाठी तुम्ही इतकंच करायचं -

https://bit.ly/3cvRWB8 या लिंकवर नोंदणी करा.नोंदणी करुन झाल्यावर तुमच्या ई- मेल आयडीवर संदेश येईल.यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.नियम व अटी लागू असतील.अन्य कलाकार आणि त्यांच्या संगीत संवादाच्या तारखा

१९ मे : प्रसन्नजीत कोसंबी२० मे : अंजली आणि नंदिनी गायकवाड२१ मे : रोहित राऊत२२ मे : अंकिता जोशी२३ मे : मंगेश बोरगावकर२४ मे : रीवा राठोड

टॅग्स :लोकमतमुंबईयु ट्यूब