Join us

‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’चा ‘रौप्य’ने गौरव

By admin | Updated: April 15, 2015 02:19 IST

महिलाशक्तीला बळ देणाऱ्या ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाचा ‘गोवा फेस्ट’मध्ये रौप्य पुरस्काराने गौरव करण्यात आला.

अ‍ॅबी अ‍ॅवॉर्डवर मोहोर : गोवा फेस्टमध्ये सन्मानमुंबई : पुुण्याचा गणेशोत्सव अधिक वैभवशाली करत पर्यावरणरक्षणाचा संदेश आणि ‘ती’चा गणपतीच्या क्रांतिकारक पावलाने महिलाशक्तीला बळ देणाऱ्या ‘लोकमत’च्या ‘आपले बाप्पा’ उपक्रमाचा ‘गोवा फेस्ट’मध्ये रौप्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. माध्यम आणि जाहिरात क्षेत्रातील ‘आॅस्कर’ मानल्या जाणाऱ्या या अ‍ॅवॉर्डवर मोहोर उमटवून ‘लोकमत’च्या या अभिनव कल्पनेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. गोव्यात झालेल्या शानदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण झाले.