Join us  

सिद्धिविनायक मंदिर पोस्टल स्टॅम्पचे सोमवारी अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:17 AM

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला

मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला असून, सोमवारी मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.भारतीय टपाल खात्यातर्फे ‘माय स्टॅम्प’ योजनेंतर्गत सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व ठाकरेंच्या हस्ते होणाºया या अनावरण कार्यक्रमाला मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासहित सर्व विश्वस्त, टपाल खात्याचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल, प्रधान सचिव एन. जे. जमादार उपस्थित राहतील.टपाल खात्याने सिद्धिविनायक गणपती मंदिर, मुंबई या नावाने माय स्टॅम्प योजना सुरू केली असून, त्याद्वारे भक्तांना स्वत:चे, परिवाराचे, मित्रांचे, नातेवाइकांचे छायाचित्र सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला छापून मिळेल, अशी माहिती मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांनी दिली.सिद्धिविनायक मंदिराचे टपाल तिकीट तयार असतानाही, महत्त्वाच्या नेत्यांची वेळ मिळत नसल्याने टपाल तिकिटाचे अनावरण लांबल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’ने दिले होते.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सव