Join us

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिध्दी मणेरीकर हिचा सत्कार

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 11, 2023 17:37 IST

अमोल कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात सिध्दीला वॉल क्लामिग खेळात प्रथम शिवछत्रपती मिळाला म्हणून कौतुक केले

मुंबई-गोरेगाव (पूर्व) आरे कॉलनीतील आदर्श नगर येथे शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर समाजसेवक सुनिल कुमरे यांच्या उपस्थित वॉल क्लीनिंग या खेळासाठी सिध्दी मणेरीकर हिला राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदर्श नगर जनतेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी अमोल कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात सिध्दीला  वॉल क्लामिग खेळात प्रथम शिवछत्रपती मिळाला म्हणून कौतुक केले. यापुढे या खेळाला लोकमान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सिध्दीने आरे कॉलनीचे आदर्श नगरचे नाव मोठे केले.आपल्या विभागातील होतकरू मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून हा सत्कार आपल्या घराच्या नागरिकांकडून  केला जात असंल्याचे सुनिल कुमरे यांनी मनोगतात व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देतांना सिध्दीने सांगितले की, या खेळासाठी वॉल उपलब्ध करून दिल्यास मी मुलांना या खेळाचे प्रशिक्षण देण्यास तयार आहे.माझ्या १४ वर्षांची मेहनतिचे फळ मला या पुरस्काराने मिळाले आहे.अशीच प्रेरणा घेऊन मी पुढे जाईल व कुमरे तसेच विभागातील नागरिकाने जे प्रेम दिले आणि माझा सत्कार केला याबद्दल तीने सर्वांचे आभार व्यक्त केले. या विभागातील साई श्रध्दा मित्र मंडळ ,आरे युवक मंडळ ,प्रेरणा चॅरिटेबल ट्रस्ट,आदर्श महिला मंडळ यांच्या वतीने सिध्दी मणेरीकर हिचा सत्कार करण्यात आला.यावेळी सिध्दी कोच राहुल पेंडसे ,सिध्दीच्या आईचा सुध्दा सत्कार करण्यात आला.यावेळी रफिक शेख,विश्वास शिंदे संतोष चव्हाण सुरेश धाने, धर्म तोकला ,दिपक शिंदे हे तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. श्री गणेश कलामंच मालाड यांचा मराठमोळ्या नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुनिल कुमरे याने केले.