Join us

बाजारपेठा बंद, रस्त्यांवर शुकशुकाट

By admin | Updated: February 22, 2015 22:31 IST

महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ््या झाडून हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ भाकपसह सर्व डाव्या

अलिबाग : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ््या झाडून हत्या करण्यात आली. त्या निषेधार्थ भाकपसह सर्व डाव्या विचारांच्या संघटनांनी रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला रायगड जिल्ह्यात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला. गर्दीने वेढलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला होता.१६ फेब्रुवारी रोजी कॉ. पानसरे यांच्यावर कोल्हापुरात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात पानसरेंसह त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होेत्या. कोल्हापुरातून त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्राणज्योत शुक्रवारी रात्री मालवली. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, रोहे, माणगाव, महाड, उरण यासह अन्य तालुक्यात बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे नेहमीच्या गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवेतील औषध आणि दुधाची दुकाने मात्र खुली होती. काही ठिकाणी भाजी विक्रेते, हातगाडीवाले किरकोळ प्रमाणात रस्त्यावर दिसून आले. सरकारी कार्यालये, बँका, पतसंस्था, सरकारी तसेच निमसरकारी संस्था रविवारी नियोजित सुट्टी असल्याने त्या नेहमीप्रमाणे बंद होत्या. (प्रतिनिधी)