नामदेव मोरे - नवी मुंबई
महापालिकेने 35 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या वंडर पार्कची दोन वर्षात दुरवस्था झाली आहे. पावसाळा संपला तरी येथील टॉय ट्रेनसह राइड सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे शुल्क भरून उद्यानात प्रवेश करणा:या नागरिकांचा आणि बच्चेकंपनीचा हिरमोड होत आहे. तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे दिवाळीच्या सुटीमध्ये उद्यानात भेट देणा:यांची संख्या घटली असून, शुकशुकाट पसरला आहे.
एकविसाव्या शतकातील नियोजित शहर असा डंका पिटणा:या नवी मुंबईमध्ये पर्यटनस्थळांकडे पूर्णपणो दुर्लक्ष करण्यात आले आहे. पर्यटनस्थळांची उणीव भरून काढण्यासाठी आणि नागरिकांना मनोरंजन व्हावे यासाठी महापालिकेने नेरूळ सेक्टर 19 मध्ये वंडर पार्क तयार केले. 15 डिसेंबर 2क्12 ला तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. शहरवासीयांनीही उद्यान पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. नवी मुंबईतीलच नव्हे, तर बाहेरील नागरिकही उद्यान पाहण्यासाठी येत होते. परंतु पालिकेकडून देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने अवघ्या दोन वर्षात या उद्यानाची दुरवस्था झाली.
महापालिकेस या उद्यानात अद्याप फूड कोर्ट सुरू करता आलेले नाही. यामुळे नागरिकांना बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जावे लागत आहे. सार्वजनिक पाणपोईव्यतिरिक्त कोणतीही सुविधा या ठिकाणी नाही. अध्र्या भागाचा अद्याप विकास करता आलेला नसून, येथील तळ्यांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पार्कमध्ये ऑक्टोपस, फेरीस व्हील, ब्रेकडान्स, फ्रिसबी या चार राइड असून टॉय ट्रेनही आहे. पावसाळ्यापासून सर्व राइड बंद आहेत. दिवाळीची सुटी पडल्यामुळे लहान मुले मोठय़ा प्रमाणात उद्यानामध्ये येत आहेत. परंतु राइड व टॉय ट्रेन बंद असल्यामुळे सर्वाना निराश होऊन परत जावे लागत आहे. राइड कधी सुरू होणार, याविषयी कोणतीही माहिती नागरिकांना दिली जात नाही. येथील सुरक्षारक्षक किमान 15 ते 2क् दिवस अशीच स्थिती राहील असे सांगत आहेत. नागरिकांना उद्यानामधील प्रवेशासाठी 35 रुपये तर लहान मुलांसाठी 25 रुपये खर्च करावे लागत आहेत. एवढे पैसे खर्च केल्यानंतर आतमध्ये जाणा:या नागरिकांना निराश होऊन परत फिरावे लागत आहे.
याविषयी माहिती घेण्यासाठी उद्यान विभागाचे प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत तायडे यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन कट करून प्रतिक्रिया देणो टाळले.
पाहण्यासारखे
काहीच नाही
च्वंडर पार्कमध्ये राइड व टॉय ट्रेन बंद असल्यामुळे आता पाहण्यासारखे काहीच राहिलेले नाही. झोपाळे व घसरगुंडीच शिल्लक राहिलेली असून, फूड कोर्टही सुरू न झाल्यामुळे उद्यानात यायचे कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.