Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या भेटीला शुभा राऊळ

By admin | Updated: July 2, 2015 22:44 IST

मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांची मनपाच्या मुख्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी झालेल्या बैठकीत

वसई : मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांची मनपाच्या मुख्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी झालेल्या बैठकीत महापौर ठाकूर यांनी राऊळ यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीत झालेली विकासकामे व प्रशासकीय कामकाजाची पद्धत याबाबत माहिती घेतली.वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान पटकाविणाऱ्या प्रवीणा ठाकूर यांना भेटण्यासाठी शुभा राऊळ गुरुवारी मनपाच्या विरार येथील मुख्यालयात आल्या होत्या. त्यानंतर, या दोघींमध्ये झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)