Join us  

शिवरायांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या छिंदमला मतदारांचा हिसका, डिपॉझिटही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:20 PM

अहमदनगर शहर मतदारसंघातील मतदारांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना निवडून दिलंय.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमनेही विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, छिंदमला मतदारांनी चांगलाच हिसका दाखलवाय. शिवाजी महाराजांबद्दल काहीही ऐकू शकत नाही, हे महाराष्ट्रातील आणि अहमदनगर जिल्ह्यातील जनतेनं आपल्या मतपेटीतून दाखवून दिलंय. अहमदनगर शहर या मतदारमधून बहुजन समाजवादी पक्षाच्या तिकीटावर छिंदमने निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत छिंदमचा दारूण पराभव झालाय. या मतदारसंघातून आमदार संग्राम जगताप विजयी झाले आहेत. 

अहमदनगर शहर मतदारसंघातील मतदारांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हणत विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना निवडून दिलंय. तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघातील बसपचा उमेदवार श्रीपाद छिंदमला केवळ 2 हजार 923 मते मिळाली आहेत. त्यामुळे त्याचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. राष्ट्रवादीच्या जगताप यांना 81 हजार 231 मतं मिळाली. तर, शिवसेनेच्या राठोड यांना 70 हजार 78 मतं मिळाली आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजपाला मोठा धक्का देत 12 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे.

श्रीपाद छिंदमने फोनवरील संभाषणादरम्यान शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, महाराष्ट्रातली जनतेनं छिंदमला सळो की पळो करुन टाकल. छिंदमला काही दिवसांसाठी तडीपारही करण्यात आला होता. या प्रकरणानंतर भाजपामधूनही छिंदमची हकालपट्टी करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत छिंदमने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी 970 मतांनी छिंदमचा विजय झाला होता. मात्र, विधानसभा निवडणूकीत जनतेनं छिंदमला आपला हिसका दाखवला असून त्याचे डिपॉझिटही जप्त झालंय.  

टॅग्स :मुंबईश्रीपाद छिंदमविधानसभा निवडणूक 2019अहमदनगर