Join us

‘श्रीखंड’,‘बासुंदी’ने वाढणार पाडव्याची लज्जत

By admin | Updated: April 7, 2016 01:36 IST

सण म्हटला की, गोडधोड पदार्थ आलेच. गुढीपाडवा अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी कोणता गोडधोड पदार्थ बनवायचा, याचा बेत आखला जात असून, ग्राहकांना तृप्त

लीनल गावडे,  मुंबईसण म्हटला की, गोडधोड पदार्थ आलेच. गुढीपाडवा अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरोघरी कोणता गोडधोड पदार्थ बनवायचा, याचा बेत आखला जात असून, ग्राहकांना तृप्त करण्यासाठी मिठाईची दुकानेही सज्ज झाली आहेत.पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदू नववर्षाचे स्वागत गोड पद्धतीने करण्यासाठी प्रत्येक घरात विशेष मेजवानी असते. वरण, भात, उसळ, पुरी, पापड, लोणचे, कोशिंबिरीसोबत ‘कुछ मिठा हो जाए!’ म्हणत अनेकांकडे श्रीखंड-पुरी, बासुंदी-पुरीचा बेत आखण्यात आला असेलच. दुकानदार अमरिश सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीखंडामध्ये मिक्स ड्रायफ्रुट, आम्रखंड, काजू-बदाम, मनुके, केशर असे फ्लेवर्स आहेत. यातील ‘आम्रखंड’ प्रकार अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. बासुंदीमध्येही अंगूर बासुंदी, मिक्स फ्रुट बासुंदी, ड्रायफ्रुट बासुंदी असे प्रकार उपलब्ध आहेत. शिवाय, पेढे, बर्फी, दुधी हलवा, गाजर हलवा, गुलाब जामून, पुरणपोळी यांचा पर्यायही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, पण सर्व गोडधोड पदार्थांत ‘श्रीखंड’ आणि ‘बासुंदी’ला जास्त मागणी मिळत आहे. पाडव्याच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आत्तापासूनच अनेक ग्राहकांनी आॅर्डर देण्यास सुरुवात केल्याचेही दुकानदारांनी सांगितले. ऐन सणाच्या दिवशी गर्दीचा त्रास होऊ नये किंवा आवडत्या पदार्थाचा आस्वाद घेण्यापासून वंचित राहू नये, म्हणून ग्राहक आधीच आॅर्डर देत असल्याची माहिती दुकानदारांनी दिली.> गोडधोड पदार्थांचे दरपदार्थदर (रुपये/किलो)आम्रखंड२४० ते ३८०बासुंदी२८० ते ३८०काजू कतली३०० ते ८००मोतीचूर लाडू३५० ते ५५०बर्फी३५० ते १२००पेढे४८० ते ६००दुधी हलवा२५० ते ४५०गाजर हलवा२५० ते ४००