Join us  

पेपर दिखाओ, नही तो तोड देंगे!, मनपा अधिका-यांची दंडुकेशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 7:35 AM

लोअर परळच्या दुर्घटनेनंतर झोपेचे सोंग सोडून सुट्टीच्या दिवशीही धडक कारवाईला लागलेल्या महापालिका अधिकाºयांकडून अधिकृत हॉटेल चालकांनाही त्रास दिला जात असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. ‘१५ मिनिट मे कागद दिखाओ, नही तो सब तोड दुंगा!’ अशा शब्दांत मनपा अधिकारी दंडुकेशाहीचा वापर करत कागदपत्रांची मागणी करत असल्याचे एका चालकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.

-चेतन ननावरेमुंबई : लोअर परळच्या दुर्घटनेनंतर झोपेचे सोंग सोडून सुट्टीच्या दिवशीही धडक कारवाईला लागलेल्या महापालिका अधिकाºयांकडून अधिकृत हॉटेल चालकांनाही त्रास दिला जात असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. ‘१५ मिनिट मे कागद दिखाओ, नही तो सब तोड दुंगा!’ अशा शब्दांत मनपा अधिकारी दंडुकेशाहीचा वापर करत कागदपत्रांची मागणी करत असल्याचे एका चालकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. त्यात एकाच दिवसात शेकडो हॉटेल व बारच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणारे प्रशासन इतके दिवस झोपले होते की झोपेचे सोंग घेऊन बसले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रामाणिकपणे धंदा करणाºया हॉटेल चालकांनाही कागदपत्र तपासणीच्या नावावर मनपा अधिकारी त्रास देत असल्याची तक्रार काही चालक व मालकांनी व्यक्त केली आहे. लोअर परळच्या कमला मिल कंपाउंडमधील ९९ टक्के बार, पब आणि रेस्टॉरंट थर्टीफर्स्ट दिवशीही बंद होते. गुरुवारी रात्रीच्या भीषण दुर्घटनेनंतर गेल्या तीन दिवसांत येथील शेकडो अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईत प्रामाणिकपणे केवळ रेस्टॉरंट आणि बारचा धंदा करणाºया चालकांनाही त्रास दिला जात आहे. कायद्याच्या दंडुक्यावर मनपा अधिकारी वारंवार एकाच कागदपत्राची मागणी करत असल्याची तक्रार एका चालकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.संबंधित चालकाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ते रविवारदरम्यान येथील हॉटेल हाउसफुल्ल असतात. त्यात थर्टीफर्स्टला मोठ्या संख्येने ग्राहक येणार होते. मात्र मनपा अधिकाºयांसह स्थानिक राजकीय पदाधिकारीही हॉटेल बंद ठेवण्यासाठी धमकावत आहेत. दुर्घटनेचे दु:ख असल्याने दोन दिवस स्वत:हून हॉटेल बंद ठेवले होते. मात्र कायमचा धंदा बंद करू शकत नाही, रोजचा व्यवसाय बुडत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होत असून येथील कामगारांचाही रोजगार बुडत असल्याचे संबंधित मालकाने सांगितले.पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘पार्टी हार्ड’!मुंबईसह राज्यातील पंचतारांकित हॉटेलमधील पार्ट्यांवर लोअर परळ दुर्घटनेचा म्हणावा तितका परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष दिलीप दातवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.दातवानी म्हणाले की, छोट्या म्हणजेच वन स्टार व टू स्टार रेस्टॉरंटमधील पार्ट्यांवर काहीसा परिणाम झाला आहे. महापालिकेकडून सुरू असलेल़्या झाडाझडतीमुळे लोकही दुरावले आहेत. याउलट हॉटेल ताज, सहारा स्टार अशा पंचतारांकित व नामांकित हॉटेलमधील पूर्वनियोजित पार्ट्या नियोजनानुसार पार पडणार आहेत.उच्चपदस्थ अधिकाºयांना भेटणार!हॉटेल चालकांना मुद्दामहून त्रास देणाºया अधिकाºयांविरोधात उच्चपदस्थ अधिकाºयांकडे धाव घेणार असल्याची प्रतिक्रिया आहारचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी व्यक्त केली. शेट्टी म्हणाले की, मनपा अधिकारी किंवा राजकीय पदाधिकाºयांकडून त्रास होत असल्यास संघटनेकडे तक्रार करावी. त्यात अधिकृत बांधकामांवर अनधिकृत म्हणून कारवाई केली असेल, तर नक्कीच संघटना सदस्यांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवमुंबईमुंबई महानगरपालिका