Join us

डोंबिवलीत मोदी ब्रिगेड दाखवा अन् बक्षीस मिळवा

By admin | Updated: July 7, 2015 00:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेऊन ‘स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली’ या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागावर अंकुश ठेवण्यासाठी

अनिकेत घमंडी  डोंबिवलीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेऊन ‘स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली’ या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागावर अंकुश ठेवण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘मोदी ब्रिगेड’ हा उपक्रम हाती घेतला होता. पक्षाचे कार्यकर्ते अस्वच्छतेवर वॉच ठेवतील, असा दावा त्यांनी केला होता. परंतु, प्रत्यक्षात पहिले दोन महिने वगळता गेल्या चार महिन्यांत कचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. त्यामुळे या योजनेचे अस्तित्व दाखवा अन् बक्षीस मिळवा, असे आव्हान डोंबिवलीकरांनी आमदारांना दिले आहे. या संकल्पनेनुसार कार्यकर्ते जेथे अस्वच्छता असेल, त्याबाबतची माहिती महापालिकेच्या आयुक्तांना, उपायुक्तांना आणि प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीने देणार होते. त्यामुळे स्वच्छतेची चके्र जोमाने फिरतील, असे वातावरण निर्माण केले गेले होते. आता मात्र ते पोकळ आश्वासन होते का? सफाई कर्मचाऱ्यांसह वाहनचालकांचे जॉबकार्ड तयार केले जाणार होते. त्याची जातीने ते तपासणीही करणार होते. आतापर्यंत त्यांनी ते केले का? शहरातील प्रमुख मोक्याच्या अशा अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानातून प्रेरणा घेऊन ‘स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली’ या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या स्वच्छता विभागावर अंकुश ठेवण्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी ६ नोव्हेंबर २०१४ रोजी ‘मोदी ब्रिगेड’ हा उपक्रम हाती घेतला होता. पक्षाचे कार्यकर्ते अस्वच्छतेवर वॉच ठेवतील, असा दावा त्यांनी केला होता. परंतु, प्रत्यक्षात पहिले दोन महिने वगळता गेल्या चार महिन्यांत कचऱ्याच्या वाढत्या समस्येमुळे डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. त्यामुळे या योजनेचे अस्तित्व दाखवा अन् बक्षीस मिळवा, असे आव्हान डोंबिवलीकरांनी आमदारांना दिले आहे. या संकल्पनेनुसार कार्यकर्ते जेथे अस्वच्छता असेल, त्याबाबतची माहिती महापालिकेच्या आयुक्तांना, उपायुक्तांना आणि प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीने देणार होते. त्यामुळे स्वच्छतेची चके्र जोमाने फिरतील, असे वातावरण निर्माण केले गेले होते. आता मात्र ते पोकळ आश्वासन होते का? सफाई कर्मचाऱ्यांसह वाहनचालकांचे जॉबकार्ड तयार केले जाणार होते. त्याची जातीने ते तपासणीही करणार होते. आतापर्यंत त्यांनी ते केले का? शहरातील प्रमुख मोक्याच्या अशा तब्बल २५ हून अधिक ठिकाणी दिवसातून ३ वेळा कुंड्यांमधून कचरा उचलण्यात येणार, असेही ते म्हणाले होते. त्याचे काय झाले? तब्बल २५ हून अधिक ठिकाणी दिवसातून ३ वेळा कुंड्यांमधून कचरा उचलण्यात येणार, असेही ते म्हणाले होते. त्याचे काय झाले?