Join us  

स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटीस

By मनोज गडनीस | Published: February 10, 2024 5:01 PM

डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यात दिल्ली तसेच उत्तर भारतात जाणारी अनेक विमाने कमी दृष्यमानतेमुळे रद्द करण्यात आली होती.

मुंबई - गेल्या काही महिन्यात दाट धुक्यामुळे दीडशे पेक्षा जास्त विमाने रद्द झाल्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी स्पाईसजेट, एअर इंडिया, इंडिगोला कारणे दाखवा नोटिस जारी केली आहे. दाट धुक्यामध्ये किंवा कमी दृष्यमानता असताना अनुभवी वैमानिकांची नेमणूक का केली नाही, अशी विचारणा या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, डिसेंबर व जानेवारी या दोन्ही महिन्यात दिल्ली तसेच उत्तर भारतात जाणारी अनेक विमाने कमी दृष्यमानतेमुळे रद्द करण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वी कमी दृष्यमानतेमुळे एक विमान तर चक्क बांग्लादेशची राजधानी असलेल्या ढाका येथे वळविण्यात आले होते. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. यानंतर आता सरकारने या प्रकरणात लक्ष घालत या नोटिसा जारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देखील विमान कंपन्यांसोबत अलीकडेच बैठक घेत या संदर्भात विमान कंपन्या काय पावले उचलत आहेत, याचा आढावा घेतला आहे.

टॅग्स :मुंबईएअर इंडियाइंडिगो