Join us

शॉर्टसर्किटने तुर्भेत आग

By admin | Updated: September 14, 2014 00:39 IST

उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे विजेचे मीटर व विद्युत उपकरणो जळाल्याचा प्रकार तुर्भे स्टोअर येथे घडला.

नवी मुंबई : उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे विजेचे मीटर व विद्युत उपकरणो जळाल्याचा प्रकार तुर्भे स्टोअर येथे घडला. 3क् घरांमधील विद्युत उपकरणो उच्च विद्युत प्रवाहाने जळाली. मीटरला आग लागल्याने नागरिकांची पळापळ झाली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
आग लागल्याने तुर्भे स्टोअर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तक्रारीनंतर संध्याकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला, मात्र रात्री 1च्या सुमारास परिसरातील काही घरांमधील मीटरसह विद्युत उपकरणांनी पेट घेतला. भीषण आग लागण्याची शक्यताही निर्माण झाल्याने भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची माहिती वीज वितरण मंडळाला देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी पोलीस चौकीपुढे वीज मंडळाच्या संथ कारभाराविषयी राग व्यक्त केला. मध्यरात्री 3र्पयत या परिसरात तणावाची स्थिती होती. या घटनेत 3क्हून अधिक घरांमधील विद्युत मीटर, टीव्ही, पंखे यांचे जळून नुकसान झाले.
या परिसराला वीजपुरवठा करणारी विजेची न्युट्रल वायर तुटल्याने हा प्रकार घडल्याचे वीज वितरणचे सहायक अभियंता संजय काटकर यांनी सांगितले. 
न्युट्रल वायर तुटल्याने त्याच एका फेजवरील विद्युत वाहिनीमधून उच्च दाबाचा प्रवाह झाला. या उच्च दाबामुळे घरांमधील विद्युत मीटर, टीव्ही, पंखे आदी विद्युत उपकरणांनीही पेट घेतल्याचे काटकर यांनी सांगितले. या प्रकारात जळालेल्या मुख्य विद्युत वाहिनी व मीटर वीज वितरण कंपनीकडून लवकरच बसवली जातील, असे काटकर यांनी स्पष्ट केले. मात्र या घटनेने येथील नागरिक धास्तावले आहेत.  (प्रतिनिधी)
 
च्काही जण गाढ झोपेत असल्याने त्यांना घरातील उपकरणो जळत असल्याचे समजले नाही. स्थानिक रहिवासी रवी वर्मा व त्यांच्या सहका:यांनी एकमेकांच्या घराचे दरवाजे ठोठावून आगीची माहिती देत रहिवाशांना घरातून सुखरूप बाहेर काढले.
च्न्युट्रल वायर तुटल्याने त्याच एका फेजवरील विद्युत वाहिनीमधून उच्च दाबाचा प्रवाह झाला. या उच्च दाबामुळे घरांमधील विद्युत मीटर व इतर उपकरणांनीही पेट घेतला.