Join us
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात...

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

रस्त्यावर खड्डे

रस्त्यावर खड्डे
मुंबई: विक्रोळी स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे पादचार्‍यांना चालायला जागा मिळत नाही. या ठिकाणी रिक्षा उभ्या असतात. पण, गर्दीवेळी खड्ड्यांमुळे पादचार्‍यांना चालण्यास त्रास होतो.

कचरा उचलत नाहीत
मुंबई: ठाकूरद्वार नाक्यावरील गटारांची सकाळी सफाई केल्यास दुपार पर्यंत कचरा तिथेच टाकून ठेवला जातो. गटारातून काढलेला कचरा हेमराजवाडीच्या नाक्यावर टाकतात. दुपारनंतरही अनेकदा हा कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याठिकाणी दुचाकींचे पार्किंग केले जाते. कचर्‍यामुळे दुचाकीस्वारांनाही त्रास होतो.