Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेन्टाइन डेच्या खरेदीसाठी आॅनलाइन शॉपिंगची धूम...

By admin | Updated: February 9, 2015 01:55 IST

नाती अन् मैत्रीच्या पलीकडे जात जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेन्टाइन डे... निरनिराळ्या संकल्पनेतून

पूनम गुरव, नवी मुंबईनाती अन् मैत्रीच्या पलीकडे जात जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेन्टाइन डे... निरनिराळ्या संकल्पनेतून हा दिवस आणि स्पेशल डेज् साजरे करण्यासाठी प्रत्येक जण प्लॅनिंग करत आहे. तरुणवर्गाला आकर्षित करण्यासाठी सोशल साईट्सच्या माध्यमातून आॅनलाइन शॉपिंगमधून गिफ्टस्चे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहे. कॉलेज कॅम्पस, मैत्री कट्टा, सोशल साईट्सवर तरुणाई विविध डेज् साजरे करताना दिसत आहे. हे सर्व डेज् स्पेशल बनविण्यासाठी डेज्प्रमाणे सोशल साईट्सवर वेगवेगळ्या गिफ्टस्च्या आॅफर सुरू झाल्या आहेत. नवनवीन संकल्पनेतून साकारलेले विविध गिफ्टस् खरेदी करण्यात वाचणारा वेळ आणि वेगवेगळ्या आॅफर्समुळे आॅनलाईन शॉपिंगच्या पर्यायाला तरुणवर्गाची अधिक पसंती मिळत आहे. भेटकार्ड, गुलाबाचे फुल,चॉकलेट, रिंग,ड्रेस, सॉफ्ट टॉईज आणि ज्वेलरी आदी गिफ्टस् आऊट फॅशन झाले असले तरी, आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून तेच गिफ्टस् मात्र वेगवेगळ्या व्हरायटीत विविध साईट्सवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हॅलेन्टाइन डेपर्यंत विविध गिफ्टस्च्या किमतीमध्ये ५० ते ७० टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणवर्गाला अशा सोशल साईट्सची भुरळ पडत आहे.