लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केबल व्यवसायाच्या वादातून मानखुर्दमध्ये गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी घडली. यात, कोणीही जखमी झाले नसून, मानखुर्द पोलिसांनी तिघांना अटक केली.
मानखुर्द पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास मानखुर्दच्या मोहिते पाटील नगर परिसरात ही घटना घडली. याच परिसरात राहणारे राजेश ठाकूर (४३) यांचा आणि अटक त्रिकूट यांच्यात केबल व्यवसायामुळे वाद होता. तसेच काही दिवसांपूर्वी एका हत्येच्या गुन्ह्यात ठाकूर यांनी पोलिसांना आरोपींविरोधात सीसीटीव्हीचे फुटेज देण्यास मदत केली हाेती.
याच रागातून आरोपी विवेक यादव, आकाश यादव आणि योगेश हलवाई यांनी ठाकूर यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. यातून ठाकूर थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
..........................................