Join us
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांच्या विरोधात रहिवाशांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 16:10 IST

सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांची मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारपरिषद सुरु असताना हनुमान नगरमधील रहिवाशांची मुंबई मराठी पत्रकार संघाबाहेर निदर्शने सुरु होती.

ठळक मुद्देहनुमान नगरमधील रहिवाशांची मुंबई मराठी पत्रकार संघाबाहेर निदर्शने सुरु होती.

मुंबई, दि. 4 - सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांची मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकारपरिषद सुरु असताना हनुमान नगरमधील रहिवाशांची मुंबई मराठी पत्रकार संघाबाहेर निदर्शने सुरु होती. रहिवाशांनी यावेळी येवले यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. रहिवाशांच्या सदनिकांचे भाड्याचे पैसे येवले यांनी खाल्ल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. 

विक्रोळी पार्क साईट येथील हनुमान नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संदीप येवले यांनी २३ दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्या पत्रकार परिषदेत येवले यांनी विकासकाने आपल्याला १ कोटी लाच दिल्याचा आरोप केला होता. त्या रक्कमेतील ४० लाख रुपये ते सादर करू शकले होते तर ६० लाख रुपये आंदोलन आणि भ्रष्टाचार उघड करण्यासाठी खर्च केल्याचा दावा येवले यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. 

याउलट विकसकाने १ कोटी रुपये रहिवाशांच्या भाड्यापोटी दिल्याची कबुली दिली होती. त्यामुळे येवले यांनी रहिवाशांच्या भाड्याचे पैसे खर्च केल्याचा आरोप करत पत्रकार संघाबाहेर निदर्शने करत असल्याचा आरोप आंदेलनकर्त्यांचा आरोप आहे.