Join us  

धक्कादायक! वरळीच्या समुद्रात बोट बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:29 PM

एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्देसहा जणांचा सुदैवाने जीव वाचवण्यात आला आहे.एकाचा हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे.   एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई -  वरळीजवळील समुद्रात बोट बुडाली असून त्यातील सहा जणांचा सुदैवाने जीव वाचवण्यात आला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि सहा जणांचे प्राण वाचविले. तर एकाचा हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे.  

वरळीच्या समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने अमर्त्या बोटीच्या मदतीने बुडालेल्या बोटीतील प्रवाशांना वाचवण्याची मोहीम हाती घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर बोटीतील सहा जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. तसंच, सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. मात्र या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे.

टॅग्स :पाण्यात बुडणेबेपत्ता होणं