Join us
Daily Top 2Weekly Top 5

शॉकमुळे एका प्रवाशाचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2015 01:44 IST

सोमवारी रात्री टपावर बसून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांपैकी एकाचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मुंबई : सोमवारी रात्री टपावर बसून प्रवास करणाऱ्या तीन प्रवाशांपैकी एकाचा शॉक लागून मृत्यू झाला. दोन प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकलच्या टपावर हे तीन प्रवासी बसले होते. लोकल विलेपार्ले येथे रात्री ८ वाजून २१ मिनीटांनी पोहचली असता टपावरील तिघांना २५ हजार केव्हीचा शॉक बसला. तात्काळ तिघांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मृत प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.