मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ््या माध्यमातून गुरुवारी भाजपावर हल्लाबोल केला.‘बाळकडू’ चित्रपटाच्या प्रीमियरनंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील सरकार भाजपाचे असून शिवसेनेच्या पाठिंब्यावर आम्ही केवळ ते स्थिर केले आहे. या सरकारने भविष्यात मराठी माणसाच्या विरोधात काम केले तर, शिवसेनेचे आमदार आणि खासदार या सरकारला धारेवर धरतील, असा इशारा त्यांनी दिला. मागील मुख्यमंत्र्यांनी दोन नंबरचे पैसे खाल्ले, पण मराठी माणसांना मुंबईत घरे मिळवून दिली नाहीत. या सरकारमधील लोकांनी दोन नंबरचे पैसे न खाता मराठी माणसाला मुंबईत घरे मिळतील, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा शिवसेना संघर्ष करील, असे रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. तर, आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी मरीन ड्राइव्ह येथील रस्त्याच्या कामाची पहाणी केली. त्यावेळी त्यांनी तेथे बसवलेले एलईडी लाइट पाहिले आणि त्याबद्दल टिष्ट्वट केले. ‘ज्यांनी हे एलईडी लाइट बसवण्याचा निर्णय घेतला, त्यांचे या मुंबई शहरावर प्रेम नाही’, असे त्यांनी म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)
वेगवेगळ्या माध्यमातून शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल
By admin | Updated: January 23, 2015 02:10 IST