Join us

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:44 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी शेडगे यांची उमेदवारी नुकतीच जाहीर केली. या वेळी शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते. त्यानंतर, सेनाभवन येथे शेडगे यांचा शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी सत्कार केला. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिक्षक विनय शुक्ला उपस्थित होते. शिवाजी शेंडगे हे शिक्षक असून, गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत.