Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसेना- एमआयएम एका माळेचे मणी’

By admin | Updated: April 5, 2015 01:35 IST

जातीयवादी राजकारण करीत सर्वसामान्यांची डोकी भडकवित ठेवण्याचे राजकारण शिवसेना करीत असून, त्यांना समाजाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही.

मुंबई : जातीयवादी राजकारण करीत सर्वसामान्यांची डोकी भडकवित ठेवण्याचे राजकारण शिवसेना करीत असून, त्यांना समाजाच्या विकासाशी काही देणेघेणे नाही. तर एमआयएम हा अल्पसंख्याक बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न करीत आहे, हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, असा आरोप कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी केला. भारतनगर परिसरात प्रचार सभा झाली तेव्हा सेना व भाजपा संधीसाधू राजकारण करीत अच्छे दिनचे स्वप्ने दाखवित जनतेला फसवित असल्याचा आरोप राणेंनी केला. या वेळी खासदार चव्हाण म्हणाले, वांद्रे पूर्व भागात अनेक समस्या प्रलंबित असून, सेनेने काहीच कामे केलेली नाहीत. (प्रतिनिधी)