विमानप्रवासात चप्पल मारहाणीमुळे चर्चेत आलेल्या खासदार रविंद्र गायकवाडांचा पत्ता शिवसेनेनं कापला

By ऑनलाइन लोकमत on Fri, March 22, 2019 3:34pm

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते.

Open in App

मुंबई - भाजपापाठोपाठ शिवसेनेकडूनही लोकसभा निवडणुकांसाठी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. रविंद्र गायकवाड यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. रविंद्र गायकवाड हे विमानप्रवासात कर्मचाऱ्यास चप्पल मारल्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. 

शिवेसनेकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, हिंगोली आणि उस्मानाबाद या मतदारसंघात नवीन चेहरे देण्यात आले आहेत. त्यामध्ये, उस्मानाबादसाठी आमदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे. तर, हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. बसण्याच्या जागेवरून एअर इंडियाचा कर्मचारी आणि खासदार गायकवाड यांच्यात वाद झाला. त्यावेळी चिडलेल्या गायकवाड यांनी त्या कर्मचाऱ्याला चपलेने मारले होते. खासदार गायकवाड हे पुण्याहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला जात होते. त्यांनी आपण बिझनेस क्लासचं तिकिट खरेदी केले होते. पण, जेव्हा विमानात गेलो तेव्हा मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवण्यात आले. याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला असता. त्याने मला दाद दिली नाही. मला अपशब्द वापरले. त्यामुळे त्याला मारल्याचे गायकवाड यांनी सांगितले होते. गायकवाड यांच्या या प्रकरणानंतर ते देशभर चांगलेच चर्चेत आले होते. तर, एअर इंडियानेही त्यांना काही काळासाठी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली होती.  

Open in App

संबंधित

coronavirus: "महाराष्ट्र सरकारला अपयशी म्हणणाऱ्या रिकाम्या डोक्यांनी गुजरातच्या अंधार कोठड्या पाहाव्यात’’ सामनामधून भाजपावर टीका
...अन् शरद पवारांनी थेट 'मातोश्री' गाठली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तब्बल २ तास चर्चा
CoronaVirus News: रेल्वेमंत्री गोयल यांना शिवसेना, काँग्रेसचे प्रत्युत्तर
हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ
coronavirus: कोरोनाच्या अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्याशिवाय अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? शिवसेनेचा राज्यपालांना सवाल

मुंबई कडून आणखी

Cyclone Nisarga: चक्रीवादळ पूर्ण ओसरेपर्यंत महापालिकेची यंत्रणा अखंड कार्यरत राहणार; इकबाल चहल यांची माहिती
कोरोना रुग्णांच्या आडून भाजपाचं वाईट राजकारण; PFI चा फडणवीसांवर निशाणा
Cyclone Nisarga: सावधान मुंबईकर! पुढील ६ तास महत्त्वाचे; जिथे असाल तिथे सुरक्षित राहा
Cyclone Nisarga: शरद पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना तर सुप्रिया सुळेंची नागरिकांना विनंती
'सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल'

आणखी वाचा