Join us

अमित शहा यांच्या विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

By admin | Updated: October 4, 2014 08:56 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीने शुक्रवारी शिवाजी पार्क दुमदुमले.

निषेधाचे शस्त्र उपसले : महायुती फुटल्याची चीड
मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीने शुक्रवारी शिवाजी पार्क दुमदुमले. दस:यानिमित्त शिवसेनेने आयोजित केलेल्या शस्त्रपूजनाच्या वेळी शहा यांच्या इशा:यावरून महायुती फुटल्याची चीड शिवसैनिकांकडून व्यक्त झाली.
शिवसेना दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करते. मात्र या मैदानावर जाहीर सभा घेण्यास कोर्टाने र्निबध आणल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज तेथे शस्त्रपूजन व आपटय़ाच्या पानांचे 
सोने परस्परांना वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी  शिवसेनेचे ‘मिशन 15क्’ फत्ते करून राज्यात स्वबळावर सत्ता आणण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. 
 
संतप्त प्रतिक्रिया
शिवार्जी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांनी अमित शहा मुर्दाबाद, शिवसेना ङिांदाबाद, अमित शहा हाय हाय, अशा घोषणांनी शिवाजी पार्क दणाणून सोडले. महाराष्ट्रातील महायुती अमित शहा यांच्यामुळेच तुटली, अशा संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिक देत होते.