Join us

शिवजयंती मिरवणुकांनी दुमदुमले ठाणे

By admin | Updated: March 8, 2015 22:40 IST

शिवरायांची वेशभूषा साकारलेले चिमुरडे, शिवचरित्रावर आधारित देखावे,लेझीम-ढोल-ताशांचा गजर आणि जय भवानी,जय शिवाजी.

ठाणे : शिवरायांची वेशभूषा साकारलेले चिमुरडे, शिवचरित्रावर आधारित देखावे,लेझीम-ढोल-ताशांचा गजर आणि जय भवानी,जय शिवाजी....च्या जयघोषात संपूर्ण ठाणे जिल्हयात रविवारी ंशिवजयंती(तिथीनुसार) साजरी झाली. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी मुख्यालयातील महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी मासुंदा तलाव येथील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. पालखीमधील शिवप्रतिमेचे पूजन झाल्यावर मिरवणूक काढण्यात आली. आदिवासींचे तारपा नृत्य, बँड पथके, झांज पथके, दांडपट्टा फिरवणारे तरुण मिरवणूकीचे आकर्षण ठरले.