अलिबाग,माणगांव,खालापूर : रायगड जिल्ह्यातील शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:ची तुंबडी भरुन जनतेचे वाटोळे केले. शिवसेनेने असे पातक केलेले नाही आणि करणारही नाही, शेतकऱ्यांसाठी नेहमीच प्रयत्शील असल्याची ग्वाही शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी माणगांव, अलिबाग व कर्जत येथील जाहीर सभेत मतदारांना दिली आहे.श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार रवी मुंढे व महाड विधानसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. सुनील तटकरे व जयंत पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. मुंबई-दिल्ली कॉरिडोर प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसेल तर शिवसेना त्यांची एक एकर काय एक इंच देखील जमीन संपादित करू देणार नाही असा इशारा ठाकरे यांनी देवून सुनील तटकरे यांच्या पुतण्याला आडवे करण्याचे तसेच शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शेतक-यांसाठी शिवसेना प्रयत्नशील
By admin | Updated: October 12, 2014 23:03 IST