Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांमध्ये परदेशी भाषेचा शिवसेनेचा आग्रह

By admin | Updated: July 3, 2015 02:10 IST

पालिका शाळा वाचविण्यासाठी एक अजब मागणी शिवसेनेतूनच पुढे आली आहे़ स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना एखादी परदेशी भाषा अवगत असावी, असा आग्रह सभागृह नेत्या तृष्णा विश्वसराव

मुंबई : पालिका शाळा वाचविण्यासाठी एक अजब मागणी शिवसेनेतूनच पुढे आली आहे़ स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना एखादी परदेशी भाषा अवगत असावी, असा आग्रह सभागृह नेत्या तृष्णा विश्वसराव यांनी धरला आहे़ गटनेत्यांच्या बैठकीपुढील या प्रस्तावावर आयुक्तांचा अभिप्राय मागविण्यात आला आहे़पालिका शाळा आठ माध्यमांतून चालविण्यात येत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी शाळांकडे वाढता कल पाहून पालिकेनेही इंग्रजीचे वर्ग सुरू केले़ मात्र या वर्गांबरोबरच पालिका शाळांमध्ये स्पॅनिश, जापनिज आणि फ्रेंच अशा परदेशी भाषांचाही समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव बुधवारी संध्याकाळी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत सभागृह नेत्यांनी ठेवला़पुढील शैक्षणिक वर्षापासून या भाषांचा समावेश पालिकेच्या माध्यमिक वर्गांमध्ये केला जावा, अशी त्यांची मागणी आहे़ हा प्रस्ताव विश्वासराव यांनी मांडला असला तरी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचीही इच्छा असल्याचे शिवसेना गोटातून समजते़ (प्रतिनिधी)