Join us

शिवसेनेचा फर्डा वक्ता

By admin | Updated: October 16, 2014 23:06 IST

वरच्या फळीतील एका फडर्य़ा वक्त्याला शिवसेना अंतरली आहे. बाळासाहेब सभेला येण्यापूर्वी जे बिनीचे शिलेदार भाषणो ठोकीत, त्यामध्ये साबीर शेख यांचा समावेश असायचा.

आवाजाची अद्भुत देणगी असलेले, सह्याद्रीभूषण शिवभक्त, प्रवचनकार, धर्म अभ्यासक व कीर्तनकार साबीरभाई शेख यांचे 71 व्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दिवशीच निधन झाल्याचे ऐकले आणि माङयासारख्या चिरपरिचित असंख्य शिवभक्तांच्या चाहत्यांच्या हृदयात कालवाकालव झाली़ विधानभवनावर भगवा फडकवण्याच्या संकल्पनेत ते सहभागी नाहीत, हे शिवसैनिकांचेच दुर्दैव.
वरच्या फळीतील एका फडर्य़ा वक्त्याला शिवसेना अंतरली आहे. बाळासाहेब सभेला येण्यापूर्वी जे बिनीचे शिलेदार भाषणो ठोकीत, त्यामध्ये साबीर शेख यांचा समावेश असायचा. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला केले जाणारे आवाहन चुकवू नये, असे वाटायचे. प्रवचनकार व कीर्तनकार असल्यामुळे त्यांच्या भाषणावर समोरचे श्रोते मंत्रमुग्ध होत असत. आपले अवघे आयुष्य  त्यांनी महाराष्ट्रातील गडकोट-किल्ल्यांची भ्रमंती करण्यात घालविले. म्हणूनच त्यांना सह्याद्रीभूषण पुरस्कार दिला गेला़ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना जसा छत्रपतींचा इतिहास मुखोद्गत आहे तसेच शिवकालीन इतिहासाचे पैलू त्यांच्या भाषणातून प्रगट होत़ 
मुस्लिम खाटीक समाजाचे असूनही त्यांनी मुस्लिम व हिंदू धर्म ग्रंथांचा निष्ठापूर्वक अभ्यास केला होता आणि त्यातील दाखले ते भाषणातून देत असत. जिल्हाप्रमुख, आमदार ते कामगारमंत्रीपदार्पयत पोहोचलेल्या साबीरभाईंना बडेजाव आणि संपत्तीचा हव्यास मान्य नव्हता. त्यामुळेच आजच्या राजकारण्यांप्रमाणो त्यांनी माया न जमवता तसेच राहिले. गेल्या तीन ते चार वर्षापासून ते आजारी होते, परंतु त्याही परिस्थितीत महत्त्वाच्या सभा, कार्यक्रमांना ते हजर राहत. आधार घेत शारीरिकदृष्टय़ा हतबल झालेल्या साबीरभाईंना कार्यक्रमात पाहिल्यावर वाईट वाटे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ते कोन गावातील वेद हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत़े त्यांचे पुतणो अल्ताफ शेख यांच्याकडे त्यांचे वास्तव्य होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांच्या आजाराची उणीव अल्ताफ शेख भरून काढत होते.
साबीरभाई धडधाकट असते तर त्यांनी ठाणो जिल्हा पिंजून काढला असता आणि विरोधकांना नामोहरम निश्चितच केले असते. आज शिवसेनेमध्ये अभ्यासू आणि प्रभावी वक्त्यांची कमतरता आहे, ही खंत सर्वानाच आहे. त्यांचे निधन झाल्यामुळे प्रभावी वक्त्यांची साखळी खंडित झाली आहे.
महाराष्ट्रात युतीची राजवट आल्यानंतर साबीरभाईंना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद लाभले, तेव्हा अवघ्या कल्याणकरांना झालेला आनंद आज शब्दांत वर्णन करता येणार नाही. कामगार व सेवायोजन खात्याचे मंत्री म्हणून मी 1995 मध्ये त्यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळेस कामगार क्षेत्रतील दहशतवादावर त्यांनी प्रखर हल्ला चढवला होता. कामगार क्षेत्रतील कामगारांना हानिकारक असलेले कायदे शोधून काढून ते हाणून पाडण्याचे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. त्या वेळेस बीआयआर अॅक्टबद्दल भरपूर वदंता होती.
कामगारमंत्री असताना कल्याणच्या विश्रमगृहात त्यांचे सततचे वास्तव्य असायच़े कल्याणमध्ये लाल दिव्याची गाडी रोज पाहून टीकाकारांनी हे कामगारमंत्री की कल्याणमंत्री, अशी टीका केली. त्याची दखल घेऊन त्यांनी कल्याणमध्ये सततचे येणो बंद केले आणि मुंबईला मंत्र्यांच्या बंगल्यात राहू लागले अन् कल्याणकर त्यांच्या नित्य सहवासाला पारखे झाले.
 
महाराष्ट्रात युतीची राजवट आल्यानंतर साबीरभाईंना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद लाभले, तेव्हा अवघ्या कल्याणकरांना झालेला आनंद आज शब्दांत वर्णन करता येणार नाही. कामगार व सेवायोजन खात्याचे मंत्री म्हणून मी 1995 मध्ये त्यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळेस कामगार क्षेत्रतील दहशतवादावर त्यांनी प्रखर हल्ला चढवला होता. 
 
दिवाकर गोळपकर