Join us  

मुस्लिमांना आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचा शिवसेनेकडून इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:44 AM

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा मुस्लिमांसाठी शिक्षणात आरक्षण देण्याचा इरादा असल्याबाबत विश्व हिंदू परिषदेने चिंता व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने असा कोणताही प्रस्ताव असल्याचा इन्कार केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा मुस्लिमांसाठी शिक्षणात आरक्षण देण्याचा इरादा असल्याबाबत विश्व हिंदू परिषदेने चिंता व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने असा कोणताही प्रस्ताव असल्याचा इन्कार केला आहे.विश्व हिंदू परिषदेने या मुद्यावर टिप्पणी केल्यानंतर शिवसेनेने इन्कार केला आहे. महाराष्ट्र सरकारचा धार्मिक आधारावर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय चिंताजनक आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारने मुस्लिमांचा अनुनय करू नये, अशी हिंदू समाजाची अपेक्षा आहे, असे विश्व हिंदू परिषदेने टष्ट्वीट केले होते.महाराष्ट्राचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांनी २८ फेब्रुवारी रोजी सांगितले होते की, राज्यातील शैक्षणिक संस्थेत मुस्लिम समुदायाला आरक्षण देण्यासाठी कायदा केला जाईल.