Join us

पालिकेत भाजपाविरोधात शिवसेना-मनसे मैत्री !

By admin | Updated: October 17, 2014 02:48 IST

एक्ङिाट पोलमध्ये आकडा वाढताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबई महापालिकेत भाजपाने आवाज चढवत शिवसेनेची कोंडी सुरू केली आह़े

मुंबई : एक्ङिाट पोलमध्ये आकडा वाढताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबई महापालिकेत भाजपाने आवाज चढवत शिवसेनेची कोंडी सुरू केली आह़े मात्र मित्रपक्षच असा वैरी झाल्यावर शिवसेनेचा जुना शत्रू मनसे त्यांच्यासाठी धावून आला आह़े त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत अनोखी युती आज दिसली. 
विधानसभा निवडणुकीत ताटातूट झाल्यानंतरही शिवसेना-भाजपा मुंबई महापालिकेत एकत्र आह़े मात्र ही केवळ वादळापूर्वीची शांतता असून, नावापुरत्या उरलेल्या या युतीमध्ये असंतोष खदखदत आह़े मतदानाच्या दुस:याच दिवशी याची प्रचिती स्थायी समितीच्या बैठकीतून येऊ लागली आह़े पाणीपट्टी थकबाकी वसुलीची अभय योजना उद्या संपुष्टात येत असल्याने त्यास मुदतवाढ देण्याचे निवेदन प्रशासनाने आज केल़े मात्र या योजनेतील वसुलीची माहिती देण्याचा हट्ट धरत हा प्रस्ताव रोखून धरण्याचा प्रयत्न भाजपाने केला़ थकीत रकमेची माहिती देण्याचा आग्रह भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी धरला़ परंतु मनसेचे संदीप देशपांडे यांनी भाजपाला खडे बोल सुनावल़े (प्रतिनिधी)