Join us

शिवसेना देणार फेरीवाल्यांना न्याय..., वादात भारतीय कामगार सेनेची उडी; अधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:56 IST

मनसे आणि संजय निरुपम यांच्या फेरीवाल्यांच्या वादात शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने उडी घेतली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, मुंबईतील फेरीवाल्यांची सहानुभूती मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : मनसे आणि संजय निरुपम यांच्या फेरीवाल्यांच्या वादात शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने उडी घेतली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, मुंबईतील फेरीवाल्यांची सहानुभूती मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता सेनेच्या विभागवार फेरीवाल्यांच्या संघटना सुरू होत असून, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचे गोरेगावातील फेरीवाल्यांचे सहकारी अशोक देहेरे यांनी, शिवसेनेच्या माध्यमातून अधिकृत फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे.बहुसंख्य फेरीवाले हे अधिकृत असून, त्यांच्यावरील कारवाईमुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांंत महाडिक यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मुंबई फेरीवाला सेनेने गेल्या १४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांना अधिकृत फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेल्या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तोडगा काढावा, अशी मागणी पत्रातूनकेले आहे.महाडिक यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. ‘मुंबई फेरीवाला सेना’ ही भारतीय कामगार सेना महासंघाशी संलग्न असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे....तर अन्याय होणार नाहीसर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून सर्वच फेरीवाल्यांवर सरसकट कारवाई केली जात आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत आमची कोणतीच हरकत नाही. मात्र, मुंबई महानगर पालिकेने २०१४ मध्ये मुंबईतील९९ हजार ४३५ फेरीवाल्यांचा सर्व्हे करून, या अधिकृत फेरीवाल्यांकडून योग्य ती कागदपत्रे घेतली असून, योग्य ते शुल्क आकारून त्यांना पावती दिली जाते. त्यामुळे या सर्व्हे केलेल्या अधिकृत फेरीवाल्यांना मुंबई महानगर पालिकेने परवाना देऊन त्यांना जवळच जागा द्यावी. त्यामुळेमुंबईत पिढ्यान्पिढ्या आपला व्यवसाय करत असलेल्या अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही, असे अशोक देहेरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :शिवसेना