Join us

‘शिवसेनेला स्वबळावर मुख्यमंत्रिपद मिळणे अशक्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 06:12 IST

एकाकी लढून सेनेला हे यश मिळविता येणार नाही. त्यासाठी भाजपा आणि रिपाइंसोबत महायुती करावी लागेल.

मुंबई : महाराष्ट्रात स्वबळावर मुख्यमंत्रिपद मिळविण्याची शिवसेनेने घोषणा केली. मात्र, एकाकी लढून सेनेला हे यश मिळविता येणार नाही. त्यासाठी भाजपा आणि रिपाइंसोबत महायुती करावी लागेल. युतीत ज्या पक्षाचे अधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी शिवसेनेने भाजपा आणि रिपाइं अशी महायुती करावी, असे आवाहन रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.सेनेच्या ५२व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केली. याबाबत आठवले म्हणाले, स्वबळावर मुख्यमंत्रिपद मिळविणे अशक्य आहे. उद्धव ठाकरे हे खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. ते मुत्सद्दी नेते आहेत. मात्र, भाजपासोबतची युती त्यांनी तोडता कामा नये.

टॅग्स :रामदास आठवले