Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 06:09 IST

प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सोमवारी माहीम येथील हिंदुजा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

अस्वस्थ वाटू लागल्याने २२ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे निदान करण्यात आले होते. काही दिवस जोशी ‘सेमीकोमा’ (अर्ध बेशुद्धावस्थेत) या स्थितीत होते. मात्र, सोमवारी रुग्णालयातून घरी सोडताना त्यांची प्रकृती स्थिर असून, अर्धग्लानी असल्याचे हिंदुजा रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे. त्यांची प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार आहे.

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई