Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून वांद्रे पूर्वमध्ये तृप्ती सावंत

By admin | Updated: March 20, 2015 02:07 IST

शिवसेनेतर्फे कै. प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेनेचे दिवंगत आमदार कै. प्रकाश (बाळा) सावंत यांच्या निधनानंतर येत्या ११ एप्रिलला होणाऱ्या वांद्रे (पूर्व) विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेतर्फे कै. प्रकाश (बाळा) सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे माजी उद्योगमंत्री नारायण राणे आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांची नावे चर्चेत आहेत. मनसे या ठिकाणी उमेदवार देणार नाही, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी आणि एमआयएमदेखील निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात २ लाख ८५ हजार मतदार आहेत.