Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे डॉ. दिपक सावंत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 11, 2024 17:41 IST

२६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली भेट

मनोहर कुंभेजकर, मुंबई: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. २६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

या निवडणूकीत मुख्यमंत्र्यांनी व शिंदे सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांनी निवडणूक अर्ज सादर केला आहे.या उमेदवारी बाबत महायुतीचे उद्या वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे.आणि जर उमेदवारी मिळाली तर मला मनसेने पाठिंबा द्यावा अशी विनंती राज ठाकरे यांना केल्याची माहिती डॉ.दिपक सावंत यांनी लोकमतला दिली.

काल मुख्यमंत्र्यां सोबत बैठक झाली असून मुख्यमंत्री सकारात्मक असून आज रात्री ते उद्या सकाळ पर्यंत मुंबईच्या पदवीधर  जागे बद्दल तोडगा निघेल अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :मुंबई