Join us

शिवसेनेचा निर्णय होणार शुक्रवारी

By admin | Updated: September 17, 2014 02:37 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता येत्या शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावली आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेण्याकरिता येत्या शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शिवसेना भवन येथे बैठक बोलावली आहे. त्यामुळे एकूणच राज्यातील धुरंदरांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हा संपर्क नेते, विभागप्रमुख तसेच आमदार यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून देण्यात आले आहेत. 
गेले काही दिवस भाजपाबरोबर जागावाटपावरून शिवसेनेचे 
संबंध ताणले गेले आहेत. 
भाजपा 135 जागांवर ठाम 
असून, शिवसेना एवढय़ा जागा देण्यास तयार नाही. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विभागप्रमुखांना बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. भाजपाने स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला तर आपली पंचाईत होऊ नये याकरिता गेल्या 
काही दिवसांत शिवसेनेने 
भाजपाच्या वाटय़ाच्या जागेवरील उमेदवारांच्याही मुलाखती घेतल्या. (विशेष प्रतिनिधी)
 
मराठवाडय़ातील उमेदवारांच्या मुलाखती 
च्शिवसेनेने मंगळवारी मातोश्री निवासस्थानी मराठवाडय़ातील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये भाजपाच्या वाटय़ाचेही मतदारसंघ होते. रविवारी उत्तर महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यापूर्वी मुंबई, ठाणो, कोकणातील उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, 
288 जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.