Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी ते दहिसर मेट्रो लाइन ७ मार्गाला शिवसेनाप्रमुखांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

अंधेरी ते दहिसर मेट्रो लाइन ७ मार्गाला शिवसेनाप्रमुखांचेनाव द्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास ...

अंधेरी ते दहिसर मेट्रो लाइन ७ मार्गाला शिवसेनाप्रमुखांचे

नाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे जनजीवन तसेच प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी मुंबईत उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाइन क्रमांक ७ला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाइन क्रमांक ७’ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मुख्यमंत्री यांच्यासमवेत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली .

शिवसेनाप्रमुखांचे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. सर्वच स्तरातील जनसामान्यांची त्यांच्याप्रति आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसुड ओढले. मार्मिकसारख्या व्यंगचित्र मासिकामधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत ठेवण्याचे महानकार्य शिवसेनाप्रमुुखांचे होेते.

१९ जून १९६६ रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना होऊन या पदाच्या प्रमुख पदावर अर्थात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानने अत्यंत स्वाभिमानाने स्वीकारले. कुठल्याही राज्यातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम केल्यास त्या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यास जास्त वेळ लागत नाही. ही त्यांची दुरदृष्टी १९९५ साली महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर जनतेला पहायला मिळाली, ती मुंबई उभारण्यात आलेल्या ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या रूपाने असे त्यांनी सांगितले.

उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या महाविभूतीचे, व्यंगचित्रकाराचे, मराठी मनाच्या अस्मितेचे, हिंदुत्वरक्षकाचे नाव ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो क्रमांक ७’ देऊन त्यांच्या या कार्याचा यथेच्छ सन्मान करावा, असा प्रस्ताव आमदार वायकर यांनीे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. या प्रश्‍नी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील प्रस्ताव दिला असून, चर्चाही करण्यात आली. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव तसेच एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सोनिया शेठ यांनादेखील प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती वायकर यांनी दिली.

---------------------------------------------