Join us

भूखंडावर पाणी सोडणे शिवसेनेच्या आले अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:55 IST

भाजपासह विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल : विरोधी पक्षांकडून श्रीखंडाची भेट; आंदोलनाचा इशारा

मुंबई : कुर्ला येथील भूखंडाच्या प्रकरणावर पडदा पडत नाही, तोच सहा आरक्षित भूखंडांवर पाणी सोडणे शिवसेनेच्या अंगलट आले आहे. हे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये दप्तरी दाखल करण्यात आल्याचे तीव्र पडसाद पालिका महासभेत सोमवारी उमटले. त्यात विरोधी पक्षाने सत्ताधाºयांना श्रीखंड भेट दिल्याने सभागृहात गोंधळ उडाला. कुर्ला येथील भूखंड प्रकरणात मध्यस्थी करणाºया भाजपाने विरोधी पक्षांना पाठिंबा देत शिवसेनेला एकटे पाडले. हे भूखंड पालिकेने ताब्यात न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे.

अतिक्रमण असल्यामुळे कुर्ला येथील भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव फेटाळणाºया सुधार समितीने विरोधी पक्षाचा रोष ओढावून घेतला होता. हा वाद मिटला असे वाटत असताना, सुधार समितीमध्ये पुन्हा सहा आरक्षित भूखंडांचे प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आले. हाच मुद्दा उचलून धरत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्याची तयारी केली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका महासभेत सोमवारी निवेदन करून शिवसेनेला जाब विचारला. भाजपाचे गटनेते मनोज कोटक, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे हे विरोधकांच्या रोषाचे लक्ष्य ठरले. ‘शोर है शोर है शिवसेना चोर है, लांडे मामा चोर है’, ‘परत घ्या परत घ्या सहा भूखंड परत घ्या’ आदी घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले. भाजपाचे नगरसेवकही विरोधकांसोबत घोषणा देत उभे राहिल्याने सभागृहात गोंधळ उडाला.शिवसेनेचा विरोधकांवर प्रत्यारोपच्सहा भूखंडाबाबत शिवसेना सभागृहात भूमिका मांडणार होती. विरोधकांची ऐकण्याची मानसिकताच नाही. या आरक्षित भूखंडाचा प्रस्ताव सुधार समितीमध्ये दाखल होत असताना, काँग्रेसच्या तीन नगरसेवकांचे समर्थन होते. मग काँग्रेसनेही विकासकासोबत सेटिंग केली का? असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला.च्सहापैकी पाच भूखंड हे एकाच मालकाचे असताना प्रशासनाने वेगवेगळे प्रस्ताव का बनविले, याचा जाब विचारण्यासाठी हे प्रस्ताव दप्तरी दाखल केले. एकही भूखंड सोडणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचे जाधव यांनी सांगितले.शिवसेना-भाजपा आमने-सामनेलोकसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना बाहेर आलेले हे भूखंड प्रकरण शिवसेनेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. विरोधकांनी शिवसेनेला घेरले असताना भाजपानेही यात उडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप आमने-सामने आले आहेत.भाजपाने आत्मपरीक्षण करावेभूखंडांप्रकरणी भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना, ‘भूखंड चोर’ असल्याचे आरोप भाजपा नगरसेवकांनी केला, पण भाजपाच्या खासदारांनी तब्बल नऊ भूखंड लाटले आहेत. त्याच भाजपा पक्षाने भूखंडांबाबत आम्हाला ज्ञान देऊ नये. भाजपाने आत्मपरीक्षण करावे, असा टोला शिवसेना नेत्यांनी लगावला.हेच ते भूखंड...१) पोयसर - प्राथमिक व माध्यमिक शाळा (२,९८१ चौ.मी.) पुनर्वसनाचा खर्च १८.५९ कोटी, मालक : बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी२) पोयसर - महापालिका शाळा - २४५३.३१ चौ.मी. आणि २,२८४ चौ.मी. - पुनर्वसनाचा खर्च २९.५४ कोटी. मालक : बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी३) गोरेगाव - उद्यान, खेळाचे मैदान, शाळा (७,१६५ चौ.मी.), पुनर्वसन - ९४.६१ कोटी, मालक अशोक जैन.४) पोयसर - कांदिवली - क्रीडा संकुल - १,९०५ चौ.मी. आणि ४,०३५ चौ.मी., पुनर्वसन खर्च - आठ कोटी रुपये, मालक : बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी५) पोयसर - कांदिवली - विकास आराखडा रस्ता ३६.३६ मीटर, ७,१७० चौ.मी., पुनर्वसन खर्च - ४१ कोटी ६० लाख रुपये. मालक : बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी.६) पोयसर - कांदिवली - रस्ता १३.४० मीटर्स-११ हजार ५८४ चौ.मी., पुनर्वसन खर्च ६६.५० कोटी. मालक : बॉम्बे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी.एकूण - ३९ हजार ५९९ चौ.मी.या भूखंडावरील अतिक्रमणाचे पुनर्वसनासह जागा ताब्यात घेण्यासाठी २५७ कोटी रुपये खर्च.

टॅग्स :मुंबईशिवसेना