Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला बगल देत शिवसेनेने जाहीर केला वचननामा

By admin | Updated: January 19, 2017 17:56 IST

500 चौरसपर्यंत फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर नाही, तर 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 -  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेने जाहिरनाम्याची रुपरेषा थोडक्यात मांडली आहे. यामध्ये आगामी पाच वर्षात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या अनेक मुद्द्यांना शिवसेनेने हात घातला आहे. मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर आकारला जाणारा नाही. तर 500-700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात येणार आहे. तसेच, मुंबईकरांना मोफत आरोग्य सुविधा मिळाणार आहे. यासाठी, प्रमुख बाळासाहेब आरोग्य कवच योजना राबवण्यात आली आहे.

 

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -

- अखिलेश यादव यांचे कौतुक - अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात चांगले काम सुरू आहे. - 1 तारखेला अर्थसंकल्प सादर होत आहे. - आमच्या मागण्यांचे एक पत्र आम्ही केंद्राला पाठवले आहे. - लवकरच आमचा जाहिरनामा प्रकाशित होईल- #didyouknow नावाने आम्ही कॅम्पेन सुरू केली आहे. यात आम्ही केलेली कामे लोकांना सांगतोय- मुंबईकरांचा घराचा आणि आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. - सध्या कधी कुणाचा खिसा कापला जाईल हे समजत नाही. - मुंबईत 500 फुटापर्यंत ज्याची घरे त्यांना मालमत्ता कर माफ करणार. - 700 फुटापर्यंत ज्यांची घरे त्यांना करात सवलत देणार- पुढील पाच वर्षात या गोष्टी करणार- पालिका अद्ययावत आरोग्य सेवा पुरवत आहे. - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच नावाखाली मोफत आरोग्य सेवा- बाकी योजना जाहिरनाम्यात येतील- बाकी कुणी (नाव न घेता कोणत्या पक्षाने) तुम्हाला ताण दिला असेल मला माहिती नाही पण शिवसेना तुम्हाला ताण देणार नाही.